Thursday, 21 June 2007
एक प्रेयसी पाहिजे!!!!!!!
एक प्रेयसी पाहिजे ......एक प्रेयसी पाहिजे ...... एक प्रेयसी पाहिजे , पावसात चिंब भिजणारी ;अन मलाही तिच्यासोबत , भिजायला लावणारी .एक प्रेयसी पाहिजे , फुलपाखरांमागे धावणारी;फुलांचे सारे रंग उधळत , झाडांमागे लपणारी.एक प्रेयसी पाहिजे , मुग्धपणे हसणारी ;माझ्या बाहूपाशात , अलगद येऊन बसणारी .एक प्रेयसी पाहिजे, कशीही दिसणारी ;पण मनाने मात्र , अप्रतिम सुंदर असणारी.एक प्रेयसी पाहिजे, जिवलग मैत्रीण असणारी ;आमच्या नाजुक नात्याला, हळुवारपणे जपणारी.एक प्रेयसी पाहिजे, माझ्या भावना जाणणारी;मी जसा आहे तसेच , माझ्यावर प्रेम करणारी .एक प्रेयसी पाहीजे , प्रेमाला प्रेम समजणारी ; सुखा- दुःखात माझ्या , तन्मयतेने साथ देणारी.एक प्रेयसी पाहीजे........ ..
Monday, 4 June 2007
Neal !!!!!!!!! the cool man
आयुष्यात प्रेम करायचय मला..
दुर कुठेतरी समुद्र किनारी हातात हात घालून बसायचय मला,
आकाशातील तारकांकडे बघताना भविष्याचे हितगुज करायचय मला...
माझ्या मांडीवर डोके ठेऊन तिला झोपी गेलेल पहायचय मला,
तिच्या शांत चेहऱ्याकडे पहाताना स्वतःशी स्मित करायचय मला...
तिच्या सोबत थोडं दुष्टपणे वागुन तिला रागाने लालबुंद करायचय मला,
तिची आसवे पुसता पुसता पटकन मिठीत घ्यायचय मला...
आयुष्यतील माझं शिखर तिच्या सोबतीने चढायचय मला,
शिखरावर पोहोचताना माझ्या सोबतीचा आनंद तिच्या डोळ्यांतून व्यक्त झालेला अनुभवायचाय मला...
ती माझ्यापासून दूर जात आसताना ती नसल्यामुळे होणाऱ्या वेदनांना डोळ्यांवाटे मुक्त करायचय मला,
तिच्या सोबत माझे आयुष्य झऱ्याप्रमाणे अवखळ जगायचय मला...
आयुष्यात प्रेम करायचय मला....

Subscribe to:
Posts (Atom)